अलिबागच्या किनाऱ्यावर बोट बुडाली, 15 भाविक बालबाल बचावले

खांदेरी किल्ल्यावरून भाविकांना घेऊन परतणारी बोट अलिबागच्या समुद्रात बुडाल्याची घटना घडली. खराब वातावरण त्यातच क्षमतेपेक्षा जास्त काsंबलेले प्रवाशी यामुळे ही बोट उलटली. सुदैवाने बोटीतील सर्वांनाच पोहता येत असल्याने त्यांनी मोठय़ा जिद्दीने किनारा गाठला. त्यामुळे 15 प्रवाशी बालबाल बचावले असून मोठा अनर्थ टळला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

अलिबागच्या आक्षी साखर येथील 15 तरुण खांदेरी किल्ल्यावर गेले होते. किल्ल्यावरील वेताळ देवाला मान देऊन साखर किनाऱयावर परतत असतानाच अचानक खवळलेल्या समुद्रात त्यांची बोट उलटली. साखरपट्टी या ठिकाणी किनाऱयावर येताना काही अंतर उरले असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने यात कोणतीच जीवितहानी झाली नाही वा कोणीही जखमी झाले नाही. बोटीतील सर्व तरुण सुखरूपरीत्या किनाऱयावर परततानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लाटांच्या तडाख्याचा फटका

अलिबागच्या खांदेरी किल्ल्यावर वेताळ देवाचे जागृत देवस्थान आहे. येथे मान द्यायला अनेक नागरिक जात असतात. खांदेरी किल्ल्यावरून परतताना समुद्रात बोटीने तीन प्रदक्षिणा घालायची पूर्वापार परंपरा आहे. हीच परंपरा जोपासत असताना बोटीतील तरुणांच्या दोन प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. मात्र तिसऱया प्रदक्षिणेच्या दरम्यान वेगाने उसळणाऱया लाटांमुळे बोट अनियंत्रित झाली. 15 तरुणांसह बोट पाण्यात उलटली.