
सामना प्रतिनिधी। अलिबाग
लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजल्या जाणाऱया रायगड जिह्यातील 91 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत सर्वाधिक 31 जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. शिवसेनेला मिळालेल्या यशामुळे महाड, कर्जत व अलिबागमध्ये भगवा जल्लोष निर्माण झाला आहे. तर माणगाव, पेणमध्येही चांगले यश मिळाल्याने शिवसेनेचाच आवाज घुमला. हा विजय म्हणजे आगामी निवडणुकीच्या यशाची मुहूर्तमेढ समजली जात आहे.
महाड बालेकिल्ला
महाडमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवत 17 पैकी तब्बल 13 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तेटघर- रक्षा मोरे, भावे-अंकुश जाधव, निजामपूर-प्रभाकर सावंत, आंबिवली-प्रतिभा गायकर, आकले-संदीप झांजे, कांबळे- राघोबा महाडिक, वसाप-वर्षा कालप, वलंग- भारत विचारे, दहिवड- जयराम जाधव, वाळण-ज्योती पवार हे 10 सरपंच प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे तर विन्हेरे-अनंत म्हाप्रळकर, पाने-धेंडीराम कालगुडे आणि कुंभार्डे-ताईबाई कोळी हे तीन बिनविरोध सरपंच ग्रामपंचायतींवर विराजमान झाले आहेत. किंजळोली बुद्रुक ग्रामपंचायत ग्रामविकास आघाडीने ताब्यात घेतली, तर सोनघर आणि वरंडोली या दोन ग्रामपंचायती गावपातळीवर बिनविरोध निवडून आल्या. सांदोशी ही एकमेव ग्रामपंचायत ताब्यात घेण्यास काँग्रेसला यश आले.
दहिवड ग्रामपंचायत सरपंचपदी जयराम जाधव, उपसरपंचपदी विशाल म्हामूणकर यांनी विजय मिळवला. तर सदस्यपदी चेतना म्हामूणकर, गीता घोसाळकर, सुशांत महामुणी, वसंत जाधव, ताराबाई जाधव आणि दिवेकर विजयी झाले. या विजयी उमेदवारांचे आमदार भरत गोगावले यांनी अभिनंदन केले.
कर्जतमध्ये राष्ट्रवादीचा धुव्वा
कर्जत नगर परिषद काबीज केल्यानंतर शिवसेनेने आपली विजयाची घोडदौड ग्रामपंचायत निवडणुकीतही कायम ठेवली आहे. शिवसेनेने आठपैकी सहा जागांवर भगवा फडकवला. रायगड उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांच्या रणनीतीमुळे चिंचवली-सुनीता अहिर, हालीवली-प्रमिला बोराडे, किरवली-दत्तात्रय सांबरी, भालीवडी- राजेंद्र गंगावण, पळसदरी-जयेंद्र देशमुख, सावेळे-अरुण कातकरी या सहा ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचे शिलेदार थेट सरपंचपदी विजयी झाले आहेत. खांडपेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तर ममदापूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे थेट सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. चिंचवली, किरवली, पळसदरी या ग्रामपंचायती शिवसेनेने नव्याने जिंकल्या आहेत, तर ममदापूरमध्ये प्रथमच शिवसेना आघाडीने बहुमत मिळवले आहे.
अलिबागेत शिवसेनेने शेकापकडून चार ग्रामपंचायती हिसकावल्या.
अलिबाग तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आघाडीने मुसंडी मारली असून 25 पैकी 12 ग्रामपंचायतींवर पक्षाचे सरपंच म्हणून निवडून आले आहेत. यात शिवसेनेने चौल, थळ या ग्रामपंचायती राखत पुसुबळे, ताडवागळे, पुरपुंडी कोलटेंभी, ढवर या ग्रामपंचायती शेकापकडून खेचून आणल्या आहेत. तर सारळ, आगरसुरे, बामणगाव, चिंचोटी, बेलोशी, पुर्डुस या ग्रामपंचायतींवर शिवसेना, काँग्रेस आघाडीची सत्ता आली आहे. शेकापला 13 ग्रामपंचायतींवर विजय मिळविता आला आहे. मात्र अलिबागेत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली असल्याने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण आहे. थळचे शिवसेनेचे उमेदवार सुनील पत्रे हे जिह्यात सर्वाधिक साडेतीन हजार मतांनी निवडून आले आहेत.
अलिबागमधील चौल, थळ तर पुसुबळे या ग्रामपंचायतींवर शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यामुळे या दोन्ही पक्षाने येथे निवडणूक प्रतिष्ठsच्या केल्या होत्या. या तीनही पंचायतींमध्ये शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस सुनील तटकरे यांनी प्रचार केला होता. मात्र या तीनही ग्रामपंचायतींवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. तर पुसुबळे, ढवर, ताडवागळे, पुरपुंडी, कोलटेंभी या ग्रामपंचायतींवर वीस वर्षांपासून शेकापची सत्ता होती ती उलथवून टाकण्यात शिवसेनेला यश आले आहे.
शिवसेनेचे विजयी शिलेदार
चौल- प्रतिभा पवार , थळ- सुनील पत्रे, पुसुबळे- मीना लोभी, ताडवागळे- रुपाली शिर्पे, पुरपुंडी कोलटेंभी- दिलीप पाटील, ढवर- विश्वनाथ गावंड हे उमेदवार थेट सरपंचपदी निवडून आले आहेत. तर काँग्रेस शिवसेना आघाडीतर्फे बेलोशी- पृष्णा भोपी, आगरसुरे-जागृती पेढवी, पुर्डुस- अनंत पाटील, बामणगाव- नंदपुमार राऊत, चिंचोटी- बंदीता पाटील, सारळ- अमृता नाईक हे सरपंचपदी निवडून आले आहेत.
तालुकानिहाय निकाल
अलिबाग- एकूण जागा- 25
शिवसेना- 6
शिवसेना, काँग्रेस आघाडी- 6
शेकाप- 13
महाड – एकूण जागा 17
शिवसेना – 13
अपक्ष – 3
काँग्रेस – 1
कर्जत – एकूण जागा 8
शिवसेना – 6
राष्ट्रवादी – 1
शेकाप – 1
मुरुड – एकूण जागा 3
शिवसेना – 1
शेकाप – 2
माणगाव – एकूण जागा 11
शिवसेना – 4
राष्ट्रवादी – 7
तळा – एकूण जागा 5
राष्ट्रवादी- 3
ग्रामविकास- 2
श्रीवर्धन – एकूण जागा 4
शिवसेना – 1
राष्ट्रवादी – 3
म्हसळा – एकूण जागा 4
राष्ट्रवादी – 3
ग्रामविकास – 1
रोहा – एकूण जागा 6
राष्ट्रवादी – 3
शेकाप – 2
ग्रामविकास – 1
पेण – एकूण जागा 5
शेकाप – 4
भाजप – 1
पनवेल – एकूण जागा 2
भाजप – 1
शेकाप – 1
उरण – एकूण जागा 1
भाजप – 1































































