अखिल हिंदुस्थानी ऑनलाइन स्पर्धा – प्रणवने जिंकली बुद्धिबळ स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिरक महोत्सवी वर्षानिमित्त माझी माऊली देवी-सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ, जे. जे. हॉस्पिटल परिसर भायखळा आणि आयडियल स्पोर्टस् अॅपॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिलीप करंगुटकर स्मृती 12 वर्षांखालील अखिल हिंदुस्थानी ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईच्या प्रणव के.पी.ने चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. अपराजित प्रणवने साखळी 9 फेऱयांमध्ये सर्वाधिक 8.5 गुणांची नोंद करीत अजिंक्यपदाला गवसणी घातली. मुंबईच्या जैसल शाहने साखळी 7.5 गुणांसह उपविजेतेपद पटकाविले.

मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना व इन्स्टिटय़ूट फॉर चेस एक्सलन्स सहकार्यीत अखिल हिंदुस्थानी ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्रासह तामीळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, झारखंड, आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांतील खेळाडूंनी चुरस निर्माण केली. स्विस लीग पद्धतीने साखळी नऊ फेऱयांमध्ये ही स्पर्धा ऑनलाइन लिचेस प्लॅटफॉर्मवर रंगतदार झाली. पश्चिम बंगालच्या स्वप्नानील करने (6.5 गुण) तृतीय, तामीळनाडूच्या कविन बी.ने (6.5 गुण) चौथा, पंजाबच्या सेहाजप्रीत काwरने (6 गुण) पाचवा, गुजरातच्या निव शाहने (6 गुण) सहावा, तामीळनाडूच्या सूर्या ए.ने (6 गुण) सातवा तर मुंबईच्या रोहन थिटेने (6 गुण) आठवा रोख पुरस्कार मिळवला. मुंबई शहर बुद्धिबळ संघटनेचे सेव्रेटरी राजाबाबू गजंगी, सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाचे कार्यवाह चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.