अमरावतीत कारवाईच्या भीतीने रस्त्यावरची गर्दी ओसरली, विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची भरचौकात रॅपीड टेस्ट

कारण नसतांना विनाकारण शहरात फिरणार्‍या नागरिकांची भररस्त्यातच रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्यामुळे अनेकांची धावपळ झाली. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांची गर्दी कमी झाली. ही कारवाई अमरावती मनपा व पोलीस विभागाच्यावतीने संयुक्तरित्या करण्यात आली. विशेष म्हणजे अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणार्‍या राजकमल चौक, किंवा राजापेठ व इतवारा बाजार परिसरात अनेकांच्या टेस्ट घेण्यात आल्या. या टेस्टपासून बचावचा प्रयत्न अनेकांनी केला. मात्र पोलीस प्रशासन सोबत असल्यामुळे नागरिकांचा कारवाईच्या भीतीने नाईलाज झाला.

जिल्हा प्रशासनाने वारंवार विनाकारण फिरु नये यासाठी आवाहन केले होते. तरीदेखील अनेक नागरिकांनी फिरणे बंद केले होते. यावर नेमका उपाय काय म्हणूनच रस्त्यावरच विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्याचे ठरविले. त्यानुसार टेस्टसाठी एक एमब्युलंस वाहन चौकात ठेवण्यात आले होते. रस्त्याने विनाकारण फिरणार्‍या नागरिकांना अडवून त्यांना त्याचवेळी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. याठिकाणी त्यांची टेस्ट घेतल्यानंतर सोडून देण्यात येत होते. उल्लेखनीय म्हणजे अशाप्रकारची टेस्ट घेण्याकरीता अनेक जण टाळत असतात. परंतु ही नवीन पद्धत सुरु केल्यामुळे नागरिकांचा सुध्दा लाईलाज झाला. विरोध केल्यास संबंधितावर कारवाईचा बळगा उभारल्या जाणार होता. त्यामुळे अनेकांनी रस्त्यावरच टेस्ट करुन घेतले. तसेच यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर सुध्दा पोलिसांनी कारवाई केली. कारवाईच्या भीतीने अनेकाने दुसरा मार्ग शोधून पळण्याचा प्रयत्न केला. आजच्या या कारवाईमुळे दुपारपासूनच शहरातील रस्त्यावर गर्दी कमी झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या