
कांद्याच्या घटत्या दराचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच तापला आहे. विरोधी पक्षाने देखील या प्रकरणी आंदोलनं करत सरकारला धारेवर धरले आहे. कांदाप्रश्न पेटलेला असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर कांदे फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हे करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
फिलिपीन्सची राजधानी मनिला येथे कांद्याचे दर मटणाच्या तीनपटीने वाढले आहेत. हवामानातील बदल, पूर, मोरोक्कोतील उष्णता व इतर परिणामांमुळे मध्य युरोपमधील उझबेकीस्तान, कझाकस्तान, ताजिकिस्तान, बेलारूस या देशांतील कमी झालेले कांदा उत्पादन यामुळे जग हैराण झाले आहे. जागतिक बाजारपेठेत अभूतपूर्व कांदाटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे परदेशात कांद्याला सोन्याचा भाव मिळत आहे. मात्र, निर्यातबंदीमुळे हिंदुस्थानातील शेतकऱयांच्या डोळ्यांत पाणी दिसून येत आहे.






























































