
गेल्या 24 तासात अमरावती जिल्ह्यात कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 138 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मृत्यु पावलेल्यांची संख्या 301 झाली असून, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 14 हजार झाली आहे.
रविवार सायंकाळपर्यंत आलेल्या अहवालात 123 रूग्णांपैकी सर्वाधिक रूग्ण ग्रामीण भागातील आहेत. अंजनगाव सुर्जी तालुक्यात एकाचवेळी 10 रूग्ण आढळून आले असून चांदूर रेल्वे धामणगाव येथे सुद्धा नव्याने 5 रूग्ण आढळून आले आहेत. तिवसा तालुक्यात नव्या 7 रूग्णांची नोंद झाली आहे. तर भातकुलीमध्ये सुध्दा दोन नवे रूग्ण आढळून आले आहे. चांदूर बाजारयेथे 3, दर्यापूर येथे 1 तर जिल्ह्याच्या इतर तालुक्यात सुद्धा रूग्ण आढळून आले.
दरम्यान, अमरावती जिल्हा तहसिलमध्ये एकाचवेळी 10 नव्या रूग्णांची नोंद झाली असून अमरावती शहराच्या वेगवेगळ्या भागात कोरोनाबाधित रूग्ण आहे. आतापर्यंत 11 हजार 408 रूग्णांना सुटी देण्यात आली असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.27 आहे. एकंदरीतच शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आहेत.



























































