जय बाबा बर्फानी! जून महिन्यातील या दिवसापासून सुरू होणार अमरनाथ यात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देश-विदेशातील शिवभक्तांसाठी पर्वणी असलेली अमरनाथ यात्रा यंदाच्या जून महिन्यापासून सुरू होत आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे शिवभक्तांना यंदाच्या यात्रेची उत्सुकता लागली आहे.

श्री अमरनाथ श्राईन बोर्डच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा ही यात्रा 28 जून रोजी सुरू होणार आहे. या यात्रेची समाप्ती श्रावण पौर्णिमेला होणार आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र, यंदा हा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झाल्याने ही यात्रा पुन्हा सुरू करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. यात्रेसाठीच्या मार्गाची साफसफाई सुरू करण्यात आली आहे.

जूनमध्ये सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी श्राईन बोर्डतर्फेच भक्तांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यंदा कोविडमुळे नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्याची माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.