यंदाही कोरोनामुळे अमरनाथ यात्रा रद्द, टीव्ही आणि ऑनलाईन माध्यमातून दर्शन घेता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या वर्षीही अमरनाथ यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव जरी कमी झाला आहे. असे असले तरी तज्ञांनी तिसर्‍या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रशासनाने अमरनाथ यात्रा रद्द केली अहे. 28 जून पासून ही यात्रा सुरू होणार होती, त्यासाठी प्रशासनाकडूनही तयारी करण्यात आली होती. असे असले तरी टीव्ही आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून भाविकांना बाबा बर्फानीचे दर्शन घेता येणार आहे.  

गेल्या वर्षीही कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. अतिशय कडक नियम लागू करून ही यात्रा सुरू करण्यात येईल असे आधी प्रशासनाने जाहीर केले होते. फक्त 500 भाविकांना जम्मूहून अमरनाथ यात्रेला पाठवण्याची परवानगी देण्यात आली होती. भाविकांचा आरोग्याचा विचार करून निर्यण घ्यावा असे आदेश उच्च न्यायालयाने अमरनाथ श्राईन बोर्डाला बजावले होते. यात्रेमध्ये फक्त भाविकच नाही तर सुरक्षा रक्षक, आरोग्य कर्मचारी, पुजारी, तीर्थयात्रेचे आयोजन करणारे अधिकारी तसेच स्थानिक रहिवाश्यांसह घोडे आणि प्राण्यांचाही विचार केला पाहिजे असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने यात्रा रद्द करण्यात आली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य प्रमुख मनोहर नरवणे, चीफ ऑफ स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्यानी अमरनाथचे दर्शन घेतले होते.