मनोरंजनही महागणार? Amazon Prime Subscription च्या दरवाढीची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Amazon Prime Subscription Price in India पेट्रोल-डिझेलची महागाई, भाज्यांची महागाई, प्रवासही महागला आहे. त्यामुळे नागरिक हैराण आहेत. अशात काहीसा वेळ मनोरंजन करणारे ओटीटी अॅपचे दर देखील वाढत चालले आहेत. त्यामुळे मनोरंजन ही महागणार आहे. Amazon Prime Subscription घ्यायला जात असाल किंवा रिन्यू करू इच्छित असाल तर लक्ष असू द्या कारण दर महागण्याची शक्यता आहे. वार्षिक वर्गणीच्या किमती 50 टक्क्यांनी महागणार असल्याचे कळत आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

Amazon Prime Membership Fee

Amazon Prime चा वार्षिक सब्सक्रिप्शन प्लान 999 रुपयात उपब्ध होता. आता मात्र त्यात 50 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. कारण आता वार्षिक प्लानसाठी 1499 रुपये खर्च करावे लागण्याची शक्यता आहे. असं म्हटलं जात आहे की महिना आणि तीन महिन्यांच्या सब्सक्रिप्शन प्लानमध्ये देखील दर बदल पाहायला मिळेल असं ही कळत आहे.

Amazon ने आपल्या वेबसाइटवर नवे प्लान दिले आहेत. त्यात माहिती अपडेट करण्यात आली आहे. वार्षिक प्लानची किंमत 999 रुपये ऐवजी 1499 रुपये इतकी करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. तीन महिन्यांचा प्लान 329 रुपयांवरून 459 रुपये इतकी करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. महिन्याच्या प्लानची आधीची किंमत 129 रुपये होती ती आता वाढून 179 रुपये इतकी करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

amazon-prime

लवकरच हे दर लागू करण्यात येतील, असंही बोललं जात आहे. मात्र निश्चित तारीख अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. Amazon Prime चे फायदे आहेत की हे सब्सक्रिप्शन केवळ Video पुरते मर्यादित नाही. Amazon Music, Amazon Reading, Prime Gaming हे सर्व त्यात वापरता येते.