आंबेहळदीचे हे उपयोग आहेत गुणकारक, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंबेहळद हा एक हळदीचा प्रकार आहे. आंबेहळद ही सामान्य हळदीपेक्षा उग्र वासाची व उग्र गुणधर्माची अ‍सते.पूर्वीच्या काळी पायाला थोडा मुक्कामार लागला किंवा पायाला सूज आली की आंबेहळद लावली जायची. त्याकाळी आतासारखे दवाखाने किंवा हॉस्पिटल नव्हते. त्यामुळे वैद्यबुवा असो किंवा घरचा आजीचा बटवा शरीरावर कोणताही मार लागला की त्यावर आंबेहळदीचा लेप लावला जाई.

कालांतराने प्रत्येकाच्या घरातून आंबेहळद हळूहळू कमी झाली आणि त्याची जागा पेनकिलर किंवा अन्य औषधांनी घेतली. परंतु, आंबेहळद ही अत्यंत गुणकारी आहे. विशेष म्हणजे आंबेहळद की वेळ मार लागल्यावरच वापरतात हा एक समज आहे. आंबेहळदीचे अनेक गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे हे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

शरीराच्या एखाद्या भागावर सूज, वेदना असतील तर तेथे आंबेहळदीचा लेप केल्यास त्वरीत आराम मिळतो.
शरीरावर कुठेही गाठ आल्यास त्यावर आंबे हळदीचा लेप केल्यास आराम मिळतो.
अंगावर बारीक पुरळ उठल्यास त्यावर जिरे, आंबेहळदी लेप केल्यास त्वरीत आराम मिळतो.
चिमूटभर आंबेहळद व दुधावरील साय एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळते.