
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ४० एकर जमीन घोटाळाप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
अमेडिया कंपनीत ९९ टक्के शेअर पार्थ पवारांचे आहेत आणि १ टक्का दिग्विजय पाटील म्हणून आहे त्याचा आहे. १ टक्का शेअर असणाऱ्यावर गुन्हा दाखल होतो आणि ज्याचा ९९ टक्के शेअर आहेत त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. मग या कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा. या कंपनीकडे तीनशे कोटी रुपये कुठून आले? याची चौकशी झाली पाहिजे. एक गुंठा जमीन विकता येत नाही यांनी सरकारी जमीन विकली ४० एकर ती पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधली, हे कसं होऊ शकतं? हे सरकार मोदींचं सरकार म्हणत होतं ना खाऊंगा ना खाने दुंगा, इथं काय प्रकार आहे? समजा हे उघड झालं नसतं तर? पार्थ पवार मालक झाले असते त्या १ टक्का असलेल्या पाटीलला दिली असती का? त्यामुळे राज्य सरकार लपवा छपवी करतंय. बनवा-बनवी करतंय, फसवेगिरी करतंय आणि या प्रकरणी पार्थ पवारवर कारवाई झाली पाहिजे. अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केली.
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ४० एकर जमीन जिची किंमत १८०० कोटी रुपये त्या जागेचा ५०० रुपयात व्यवहार होतो. याची सगळी चौकशी झाली पाहिजे. पार्थ पवारवर कारवाई झाली पाहिजे आणि अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.


























































