​बळीराजा आणि सामान्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारा हा अर्थसंकल्प – अंबादास दानवे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधानपरिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी X वर काही महत्त्वाचे मुद्दे मांडत या अर्थसंकल्पावर व सरकारवर टीका केली आहे. ”हा अर्थसंकल्प बळीराजा आणि सामान्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारा आहे”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

अंबादास दानवे यांनी मांडलेले मुद्दे –

​१. कृषी क्षेत्राची वाताहत: राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल कृषी क्षेत्राच्या दुरावस्थेवर शिक्कामोर्तब करतोय. शेती रसातळाला गेली असताना सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडतंय!
​२. कर्जमाफी की मृगजळ?: राज्याची आर्थिक स्थिती आणि प्रलंबित अनुदाने पाहता, जाहीर केलेली कर्जमाफी ही वस्तुस्थितीपेक्षा ‘मृगजळ’ ठरण्याचीच भीती अधिक आहे. मुख्यमंत्री महोदय, यावर स्पष्ट का बोलत नाहीत?

​३. शहरी झगमगाट, ग्रामीण अंधार: मेट्रो आणि विमानतळांसाठी भरघोस तरतूद, पण बळीराजाच्या झोळीत काय? हे बजेट केवळ ‘शहरी महाराष्ट्रा’साठीच बनवलंय का?

​४. ७.५ HP पंपांचा जुमला: पंपांच्या सवलतीची घोषणा करताना हे पंप वापरणारे शेतकरी नेमके किती आहेत? याचा डेटा सरकारने का लपवला? की ही केवळ आकड्यांची खेळी आहे?

​५. लाडकी बहीण योजनेचं गौडबंगाल: योजनेला लागणारे ४५ हजार कोटी अर्थसंकल्पात दिसत नाहीत! मग हा निधी इतर खात्यांच्या तरतुदीला ‘कात्री’ लावून उभा करणार का? सरकारने याचं उत्तर द्यायलाच हवं!