
कोरोना लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या उत्तराखंडच्या चारधाम देवस्थान बोर्डाला हिंदुस्थानचे अग्रगण्य उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांकडून 5 कोटी रुपयांचे मोठे दान देण्यात आले आहे.
देवस्थानने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बोर्डाला मदत करण्याची विनंती अंबानी कुटुंबाला केली होती. कोरोना लॉकडाऊनमुळे एरव्ही भक्तांच्या तुडुंब गर्दीने भरणारी चारधाम मंदिरे गेले कित्येक महिने भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे दानाचा ओघ थांबल्याने मंदिर ट्रस्टला कर्मचाऱ्य़ांचे पगार भागवणेही कठीण झाले होते.या संकटात मंदिराला आर्थिक मदत करावी असे साकडे मंदिर ट्रस्टने मुकेश अंबानी यांच्यासह अन्य नामवंत उद्योगपतींना घातले होते. त्यानुसार अंबानी कुटुंबाच्या वतीने मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी दानाचा धनादेश चारधाम मंदिर ट्रस्टचे अतिरिक्त सीईओ बी.डी. सिंह यांच्याकडे सुपूर्द केला.

























































