अमेरिकेत बर्गरसाठी 4 किमीच्या रांगा अन् 14 तास वेटिंग!

अमेरिकन नागरिकांच्या बर्गर प्रेमाबद्दल तुम्हाला वेगळं काही सांगायला नको. नुकताच अमेरिकेतील कोलाराडोमधील एक पह्टो सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या पह्टोत गाडय़ांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसतायत. या रांगा वाहतूककोंडीमुळे नाही तर बर्गर खरेदी करण्यासाठी लागल्या आहेत.

नुकतेच कोलाराडो येथे प्रसिद्ध फूड चेन इन अॅण्ड आऊटचे नवीन आऊटलेट सुरू झाले आहे. नागरिकांना याची माहिती मिळताच रात्री 2 वाजल्यापासूनच बर्गरसाठी रांगा लागायला सुरुवात झाली. बघता बघता ही रांग 4 किमीच्या पुढे गेली. आपला आवडता बर्गर खरेदी करण्यासाठी नागरिकांना तब्बल 14-14 तास प्रतीक्षा करावी लागली. इन अॅण्ड आऊट ही अमेरिकेतील 70 वर्षे जुनी फूड चेन असून तेथील सहा राज्यांत त्यांचे आऊटलेट्स आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या