अमेरिकेची अफगाणिस्तानला आर्थिक मदत, देणार 64 मिलियन डॉलर्स इतका निधी

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा ताबा आणि अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर अमेरिकेने सोमवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानच्या लोकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. अमेरिका अफगाणिस्तानच्या लोकांसाठी सुमारे 64 मिलियन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे.

अफगाणिस्तानमधील टोलो न्यूज चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉम्पसन-ग्रीनफील्ड यांनी आर्थिक मदतीचे वर्णन मानवतावादी मदत म्हणून केले आहे. संयुक्त राष्ट्रात त्या म्हणल्या की, अफगाणिस्तानची परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने मानवतावादी मदतीसाठी 64 मिलियन देण्याचे आश्वासन दिले आहे. सध्याची परिस्थितीचे अधिक आकलन केल्यानंतर भविष्यात आणखी रक्कम देण्याचा विचार केला जाईल, असं ही त्या म्हणल्या आहेत.

अमेरिकेआधी चीननेही अफगाणिस्तान सरकारला मदत करण्याची घोषणा केली आहे. चीनने 200 मिलियन युआनची (31 मिलान डॉलर्स) आर्थिक मदत जाहीर केली होती. यामध्ये अन्न पुरवठा आणि कोरोना विषाणूच्या लसींचाही समावेश आहे. चीनने म्हटले की, अफगाणिस्तानात सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी नवीन अंतरिम सरकारची स्थापना करणे आवश्यक होते.

आपली प्रतिक्रिया द्या