अमेरिकेतील न्यू ऑरलिंस शहरात गोळीबार; 11 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील न्यू ऑरलिंस शहरात रविवारी 3 वाजता झालेल्या गोळीबारात 11 जण जखमी झाले आहेत. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. न्यू ऑरलिंस शहरातील प्रसिद्ध पर्यटन केंद्र असलेल्या फ्रेंच क्वार्टरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना एका संशियताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

फ्रेंच क्वार्टर परिसरात अनेक रेस्टॉरंट आणि हॉटेल आहेत. नेहमी गजबजलेल्या असलेल्या कॅनाल रस्त्यावरील कमर्शल ब्लॉकमध्ये एकाने अंदाधुंद गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसराची नाकबंदी केली आहे. अमेरिकेत सध्या वार्षिक थॅक्स गिव्हिंग वीकेंड असल्याने सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली होती. या घटनेनंतर सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.