अमेरिकेत 2 ठिकाणी अंधाधुंद गोळीबार; 4 ठार, 5 जखमी

540

अमेरिकेतील सेंट अँटीनियो क्लब आणि होनोलूलू येथे झालेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. यात 2 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. रविवारी मध्यरात्री सेंट अँटीनियो क्लब येथे एका माथेफिरूने अंधाधुंद गोळीबार केला. ठार झालेल्यांपैकीच एकाने अचानक क्लबच्या परिसरात गोळीबार करायला सुरुवात केली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर जखमींपैकी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. या माथेफिरूला सशस्त्र सुरक्षा रक्षकाने ठार केले. दुसऱ्या एका घटनेत होनोलूलू या शहरात  दुपारी पोलीस आणि एका गुंडामध्ये चकमक उडाली. या चकमकीदरम्यान गुंडाने केलेल्या गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू झाला. बराच वेळ दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू होता अशी माहिती पोलिसांनी दिली. होनोलूलूच्या मेयर ऑफिसमधूनही दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या