
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
अमेरिकेच्या बोइंग आणि लॉकहीड या दोन कंपन्यांना हिंदुस्थानसाठी 21 व्या शतकातील अत्याधुनिक मध्यम युद्ध विमाने तयार करायची आहेत. त्याकरिता त्यांनी हिंदुस्थानसोबत ‘एफए 18’ या जातीची युद्ध विमाने तयार करण्याचा प्रस्ताव हिंदुस्थानला दिला आहे. हा प्रस्ताव हिंदुस्थानने मान्य केल्यास अमेरिकन कंपन्यांना हिंदुस्थानी जेट विमानांच्या अब्जावधी डॉलर्सची बाजारपेठ उपलब्ध होईल.
प्रकल्पासाठी कंपनी ‘एफ 16’ची संपूर्ण निर्मिती यंत्रणाच हिंदुस्थानात उभारू शकतो. त्याकरिता बोइंगच्या अभियंत्यांची संख्या तीनवरून पाच हजारांवर नेता येईल.






























































