कर्करोग रुग्णांसाठी अमित कुमार गाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी ‘अमितकुमार लाइक्ह इन कॉन्सर्ट’ या अनोख्या कार्यक्रमाचे 20 ऑक्टोबरला आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सायंकाळी 7 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ या संस्थेचे निधीसंकलन केले जाणार आहे. ही संस्था गेली 49 वर्षे कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी काम करतेय. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रवेशिका 24924000, 24926928 या फोन क्रमांकांवर उपलब्ध आहेत.