हिंदुस्थानच्या पांघलने रचला इतिहास, जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेची अंतिम फेरी गाठली

461
कझाकिस्तानच्या एकातेरिनबर्ग शहरात सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद मुष्टियुद्ध स्पर्धेत हिंदुस्थानच्या अमित पांघलने सव्वाशे कोटी हिंदुस्थानींना अभिमान वाटावा अशी ऐतिहासिक कामगिरी शुक्रवारी नोंदवली.अमितने पुरुषांच्या 52 किलो वजनी गटात यजमान कझाकिस्तानच्या साकेन बिबोसिनोवला पराभूत करीत अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक अजिंक्यपद मुष्टियुद्ध स्पर्धेच्या ईतिहासात स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला हिंदुस्थानी पुरुष बॉक्सर अशी अमितच्या नावाची नोंद झाली आहे. शनिवारी सुवर्णपदकासाठी अमितचा अंतिम सामना उझबेकिस्तानच्या हिंदुस्थानच्या शाखोबिदिन जोइरोवशी होणार आहे. 
 
हिंदुस्थानच्या मनीष कौशिकला मात्र उपांत्य लढतीत पराभूत झाल्याने कांस्यपदकावर संधान मानावे लागले.त्याला 63 किलो वाहजनी गटात क्यूबाचा अँडी क्रूज याच्याकडून पराभवाचा धक्का बसला.अर्थात मनीषचेही हे यश हिंदुस्थानी संघासाठी अतिशय गौरवास्पद मानले जात आहे.कारण तोही विजेंदर सिंह ,विकास कृष्णन,शिव थापा आणि गौरव विधुरी या जागतिक कांस्यपदक विजेत्यांच्या यादीत पोचला आहे. 
 
 अमितचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पहिलेच पदक असेल 
शनिवारी जागतिक अजिंक्यपद मुष्टियुद्ध स्पर्धेत अमित अंतिम फेरीत झुंजणार असून त्याच्या पदकाचा रंग सोनेरी कि रुपेरी हेच ठरायचे आहे. तो सुवर्णपदक जिंकल्यास हिंदुस्थानी क्रीडा क्षेत्रासाठी तो सोनियाचा दिवस ठरेल हे निश्चित.पण पदक कोणतेही मिळो ते अमितला जागतिक अजिंक्यपद मुष्टियुद्ध स्पर्धेतील पहिले पदक असेल.त्याने यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आले.जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी हिंदुस्थानच्या विजेंदर सिंह (2009) ,विकास कृष्णन (2011) ,शिव थापा (2015) आणि गौरव विधुरी (2017) यांनी कांस्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. अमितने त्याहून सरस कामगिरी नोंदवत नाव इतिहास रचला आहे. 
 
कोट 
 पदकासाठी मोठा जोर  लावावा लागेल असे वाटत असताना जागतिक स्पर्धेत अधिकच परिश्रम घ्यावे लागले आहेत. पण इथे माझ्या सर्व हिंदुस्थानी सहकाऱ्यांनी मला जो भरघोस पाठिंबा दिलाय त्याच्या बळावर मी देशासाठी पहिले वहिले सुवर्णपदक जिंकेन असा विश्वास निर्माण झाला आहे.
-अमित पांघल
आपली प्रतिक्रिया द्या