हिंसाचार चिघळण्यास शहाच जबाबदार

सामना ऑनलाईन । कोलकाता

भाजपच्या रोड शोदरम्यान घडलेल्या प्रकारास अमित शहाच जबाबदार आहेत. रोड शोमध्ये दगडफेक झाल्यानंतर कॉलेज स्ट्रीटवर हिंसाचार चिघळवण्याचाही प्रयत्न त्यांच्याच आदेशावरूनच करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत दरवाजासमोरील सर्व वाहने पेटवून दिल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

अमित शहा हे एक असभ्य व्यक्ती असून त्यांचे कार्यकर्तेही तेवढेच असंस्कारी आहेत. ईश्वरचंद विद्यासागर कॉलेजमध्ये तोडफोड आणि 19 व्या शतकातील समाजसुधारक विद्यासागर यांचा पुतळाही त्यांनी तोडला. तोडफोड करणारे सर्वजण हे बाहेरचे असून भाजपने जाणीवपूर्वक त्यांना बोलावले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शहा यांना कोलकाता विश्वविद्यालयाबद्दल माहिती आहे का? कोण कोणत्या महान हस्तींनी येथे शिक्षण घेतले आहे ते त्यांना माहीत आहे का? अशा प्रकारचे हल्ले घडवायला त्यांना लाज काटत नाही का? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

तृणमूलचे शिष्टमंडळ निकडणूक आयोगाला भेटणार
कोलकातामध्ये शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठमोठे पोस्टर लावण्यात आले होते. भाजप येथे खूप पैसे खर्च करत आहे. निकडणूक आयोग त्यांच्याकिरुद्ध काहीच कारकाई का करत नाही? याबाबत तृणमूल काँग्रेसचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार असल्याचे त्या म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या