आजारपणाच्या उलटसुलट बातम्यांमुळे बिग बी नाराज

376
जगात डावखुर्‍यांची संख्या ही १०% आहे.

नानावटी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आजारपणाविषयी मीडियामध्ये आलेल्या उलटसुलट बातम्यांवर बिग बी अमिताभ बच्चन नाराज झाले आहेत. शनिवारी त्यांनी एक ब्लॉग लिहून आपली नाराजी जाहीर केली. ‘आजारी असणं आणि उपचार घेणं हा प्रत्येक व्यक्तीचा खासगी प्रश्न आहे. स्वतःच्या व्यावसायिक स्वार्थासाठी त्याचा बाजार मांडू नका. जगातील प्रत्येक गोष्ट विकण्यासाठी नसते’ असे अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

अमिताभ बच्चन यांना शुक्रवारी (18 ऑक्टोबर) रात्री उशिरा नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही नियमित चाचण्या केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. मात्र बिग बींना यकृताचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची चर्चा होती, पण यात तथ्य नसून ते रुग्णालयात काही नियमित चाचण्या करण्यासाठी दाखल झाले होते. मीडियामध्ये आजारपणाविषयी आलेल्या बातम्यांमुळे अमिताभ बच्चन नाराज झाले. ‘या बातम्या म्हणजे एकप्रकारचे शोषणच असून ते बेकायदा’ असल्याचेही ते ब्लॉगमध्ये म्हणाले. आपल्या कामाचा आदर राखा व त्याच्या नियमांचे पालन करा असा सल्लाही त्यांनी मीडियावाल्यांना दिला.

अमिताभ बच्चन यांनी तब्येतीची काळजी करणाऱया चाहत्यांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले, ‘माझ्या उत्तम प्रकृतीसाठी देवाकडे प्रार्थना करणाऱया सर्वांना माझे प्रेम आणि त्यांचे आभार!’ अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगसोबत नुकत्याच झालेल्या वाढदिवसाचा जलसा बंगल्याबाहेरील चाहत्यांचा फोटोही शेअर केला. या फोटोत ते नात आराध्यासोबत दिसत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या