
महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या वक्तशीरपणाबाबत प्रसिद्ध आहेत. त्यांना शुटींगस्थळी कायम वेळेत पोहोचतात. नुकतेच अमिताभ बच्चन मुंबईच्या वाहतूक कोंडीत अडकले आणि सेटवर पोहोचायला उशीर होणार होता. अशावेळी त्यांनी एका अनोखीदुचाकीस्वाराकडून मदत घेतली आणि दुचाकीवर बसून चित्रिकरणाला पोहोचले. त्याबाबत नुकतेच त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्या दुचाकीस्वाराचे आभार मानले आहेत.
अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या ‘प्रोजक्ट के’ सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. सध्या या सिनेमाची शुटींग मुंबईत सुरू आहे आणि मुंबईतील वाहतुककोंडीचा अनुभव आज अमिताभ बच्चन यांनाही आला आहे. शुटींगला जात असताना ते वाहतूक कोंडीमध्ये अडकले. मात्र त्यानंतर त्यांनी वेळेवर पोहोचण्यासाठी अनोळखी दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेतली आणि ते शुटींगस्थळी पोहोचले. त्याबाबत अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ते त्या अनोळखी व्यक्तीच्या बाईकवर बसलेले दिसत आहेत. त्यांनी काळ्या रंगाचे टिशर्ट, निळी ट्राऊजर, ब्राऊन ब्लेझर आणि पांढऱ्या स्निकरवर दिसत आहेत.
View this post on Instagram
हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत अमिताभ यांनी त्या खाली फोटो कॅप्शन दिली आहे. ”प्रवासाबद्दल धन्यवाद मित्रा.. मी तुम्हाला ओळखत नाही.. पण तरीही तुम्ही मला कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवलात.. जलद आणि ट्रॅफिकमधून मार्ग काढत पोहोचवलात. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे”. धन्यवाद टोपी, शॉर्ट्स आणि पिवळा टी-शर्ट मालक ” अमिताभ बच्चननी त्याचा ब्लॉगमध्येही उल्लेख केला आहे. त्यांनी ही पोस्ट केल्यानंतर चाहत्यांचा वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात एका युजरने म्हंटलेय की, मी तुम्हाला रोज सोडायला येईन’, तर अन्य एका यूजरने दोघांनी हेल्मेट न घातल्याने त्यांना वाहतुकीच्या नियमांची आठवण करुन दिली आहे.


























































