
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आपला आगामी चित्रपट, इतर कलाकारांच्या चित्रपटाबाबत आणि समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांबाबत बिग बी आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करतात. मनातले ट्विटरवर मांडणारे बिग बी यांनी यांनी एक फोटो शेअऱ केला आहे. या फोटोमध्ये त्यांचा रुपडे पाहून कोणालाही धक्का बसेल आणि हे आहे तरी काय नक्की असा प्रश्न पडेल.
बिग बी यांनी ट्विटवर एक फोटो शेअर केला असून यात ते बकरीला चरण्यासाठी घेऊन जाताता दिसत आहेत. प्रत्येकाला प्रश्न पडला आहे की हा प्रकार नक्की आहे तरी काय. अमिताभ बच्चन यांनीही फक्त हिंट देऊन सोडून दिल्याने सर्वच याचे उत्तर शोधत आहेत. बिग बी यांनी या फोटोसोबत ‘वॉक गोट’…असे कॅप्शनही दिले आहे. या फोटोत बिग बींच्या अंगावर लाल रंगाचा पंचा दिसत आहे.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा फोटो नक्की आहे कसला. तर मिळालेल्या माहितीनुसार हा फोटो त्यांचा आगामी चित्रपट तेरा यार हू मै या चित्रपटातील आहे. सध्या ते याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. तमिळ आणि हिंदीमध्ये बनणाऱ्या या चित्रपटात बिग बी यांच्यासह सूर्या आणि राम्या कृष्णन दिसणार आहे. मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये याचे चित्रिकरण सुरू आहे. तब्बल 20 वर्षानंतर (बड़े मियां-छोटे मियां’) बिग बी आणि राम्या कृष्णच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत.
T 3138 – … I walk goat .. !! pic.twitter.com/Q4a9YCP3lV
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 10, 2019































































