पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वीकारला पदभार

पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्तालयात मावळते पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी गुप्ता यांना पुष्पगुच्छ देउन शुभेच्छा देत पदाची सूत्रे दिली.

राज्य सरकारने गृहविभागातील विशेष शाखेत प्रधान सचिव पदावर कार्यरत असलेले अमिताभ गुप्ता यांची नुकतीच पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांनी आज डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडून पदाची सूत्रे हाती घेतली. गुप्ता हे ११९२ च्या भारतीय पोलीस सेवा बॅचचे अधिकारी असून त्यांनी आयआयटीमधून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. शहरातील विविध भागात खूनाचे प्रकार, चेन स्नॅचिंग, घरफोडी, कर्मचाNयांमधील सुसंवाद वाढविण्याचे आव्हान गुप्ता यांच्यासमोर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या