अमरावती जिल्ह्यात शहरापेक्षा ग्रामीणमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त, एकूण 3436 बाधित

647

अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालात ४५ पैकी शहरातील केवळ ९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून या तुलनेत ग्रामीण भागात मात्र एकाच वेळी ३६ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. यावरून कोरोनाने ग्रामीण भागात सुद्धा उग्ररूप धारण केल्याचे स्पष्ट होते. अमरावती जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ३४३६ झाली असून एकट्या दर्यापूर तालुक्यात कोरोनाचे १९ रुग्ण आढळून आले आहे.

दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे चार रुग्ण आढळून आले असून बाभळी येथे ५ व तीन रूग्ण शिरोडी येथे आढळून आले आहे. या सोबतच सामदा येथे १ तर लेहगाव येथे ३ रुग्ण आढळून आले आहे. दर्यापुरच्याच पंजाबराव देशमुख कॉलनीत सुद्धा एका रुग्णाची नोंद झाली आहे. हिच परिस्थिती मोर्शी तालुक्याची झाली आहे. मोर्शी शहरात ४ जण कोरोनाबाधित आढळून आले असून तालुक्यातील हिवरखेड येथे सुद्धा २ रुग्णांची नोंद झाली. तसेच मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे सुद्धा २ रुग्ण आढळून आले आहे. वरुड तालुक्यात जरुड येथे ३ कोरोनाबाधित आढळून आले असून वरुड येथे सुद्धा ४४ वर्षीय महिला कोरोनाग्रस्त आहे.

आज आलेल्या ताज्या अहवालात एकाच दिवशी महसुल अधिकार्‍यासह दहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर सायंकाळी प्राप्त अहवालात ३ रूग्ण आढळले. तर अंजनगाव सुर्जी तालुक्यात ५ रूग्ण सायंकाळच्या अहवालात आढळले. या कोरोनाबाधितांना वेगवेगळ्या कोविड रुग्णालयात उपचारांसाठी पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, विदर्भात यापूर्वी सर्वाधिक रुग्ण नागपूर व अकोला जिल्ह्यात होते. आता मात्र अकोला जिल्ह्याला अमरावतीने मागे टाकले आहे. अकोल्यात सध्या ३ हजाराच्या वर कोरोना बाधित असून त्या तुलनेत अमरावती जिल्ह्यात मात्र हा आकडा ३४३६ वर गेला आहे. अशा तर्‍हेने विदर्भातील प्रमुख असलेल्या नागपूर नंतर अमरावती जिल्ह्यात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या