एसआरए मुख्यालयात आता आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष

इमारत कोसळणे, पावसाळय़ात दरड कोसळून इमारतीचे नुकसान होणे किंवा एखादी अघटित घटना घडल्यास त्यावर नियंत्रण करुन दुर्घटनाग्रस्तांपर्यंत तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी वांद्रे पूर्व येथील एसआरएस मुख्यालयाच्या तळमजल्यावर येत्या 1 जूनपासून आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात येणार आहे.

गोरेगावच्या जय भवानी इमारतीला गेल्या वर्षी लागलेल्या आगीत नऊ जणांचा मृत्यू तर 40 हून अधिक रहिवासी जखमी झाले होते. यानिमित्ताने एसआरए इमारतींची सुरक्षा वाऱयावर असल्याचे समोर आले होते. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी एसआरएने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई शहरासह उपनगरात एसआरएच्या अनेक इमारती आहेत. पावसाळय़ात एखादी दुर्घटना घडल्यास नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यादृष्टीने एसआरए मुख्यालयात आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात येणार आहे. केवळ पावसाळय़ापुरता नाही तर कायमस्वरूपी हा आपत्कालीन कक्ष कार्यरत असणार आहे.

सद्यस्थितीचा अहवाल देणार

नियंत्रण कक्षातील दुय्यम अभियंता किंवा सहाय्यक अभियंता व संबंधित विभागातील सहाय्यक अभियंता किंवा दुय्यम अभियंता घटनास्थळी जाऊन तेथील तेथील परिस्थितीची पाहणी करतील. तसेच सद्यस्थितीचा अहवाल कार्यकारी अभियंता यांना देतील.

अशा प्रकारे होणार काम

सहाय्यक अभियंता व दुय्यम अभियंता यांची नियंत्रण अधिकारी असतील. नियंत्रण अधिकारी 24 तास आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील ऑपरेटरशी संपका&त राहून काही अघटित घडल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्प साधून माहिती देतील. त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री व संबंधितांशी संपर्प साधण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता यांच्यावर राहील.