‘या’ फोटोला भन्नाट कॅप्शन द्या आणि कार बक्षिस मिळवा, महिंद्रांचे चॅलेंज

1931

महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सातत्याने ताज्या घडामोडींवर ट्वीट करून ते लक्ष वेधून घेतात. आताही ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे आणि त्याखालील कॅप्शनमुळे ते पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत. ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोला. त्यांना भन्नाट कॅप्शन देण्यास सांगितले आहे. जो व्यक्ती फोटोला समर्पक आणि भन्नाट कॅप्शन देईन त्याला महिंद्राची कार बक्षिस मिळणार आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये एका बसवर दुसरी बस उलटी ठेवल्याचे दिसत आहे. उलट्या ठेवलेल्या बसलाही हेडलाईट आणि टायर लावल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत महिंद्रा यांनी, ‘काही दिवसांपासून मी कॅप्शन कॉम्पिटिशन नाही घेतली. कॅप्शनसाठी हा सर्वोत्तम फोटो आहे. हिंदी, इंग्लिश किंवा हिंग्लिश या कोणत्याही भाषेत कॅप्शन असू शकते’, असे कॅप्शन दिले आहे.

महिंद्रा यांनी फोटो पोस्ट केल्यानंतर तासाभरात हजारो लोकांनी लाईक्स आणि कमेंट केली आहे. महिंद्रा कंपनीच्या गाड्यांची आवड असणाऱ्या आणि क्रिएटिव्ह लोकांनी भन्नाट आणि मजेशीर कॅप्शन दिल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस नेते अखिलेश सिंह यांनीही कमेंट केली आहे.

बुधवारपर्यंत संधी

जर तुम्हाला असे वाटत असेल की मी खूपच क्रिएटिव्ह आणि वेगळा विचार करणारा आहे तर तुम्हीही या स्पर्धेत भाग घेऊ शकता. बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्हाला कमेंट करून भन्नाट कॅप्शन देण्याची संधी आहे. महिंद्रा यांचे चॅलेंज पूर्ण करणाऱ्याला महिंद्राकडून शानदार कार मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या