
>> आनंद म्हाप्रळकर, आर्थिक सल्लागार, संचालक, एसजीएम ज्वेलर्स
सोने हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. प्रत्यक्ष दागिने, नाणी खरेदी केली जात असतानाच डिजिटल सोनं खरेदी करण्याकडे लोकांचा कल दिसत आहे. डिजिटल गोल्डचे फायदे जाणून घेतानाच त्यातील जोखीम माहीत असणे गरजेचे आहे.
प्रत्यक्ष सोने खरेदी करताना आपण विश्वसनीय ज्वेलर्स निवडतो. दागिनेही हॉलमार्कवाले घेतो. त्याचप्रमाणे डिजिटल सोनं खरेदी करताना ‘डिजिगोल्ड’चे प्लॅटफॉर्म पडताळून घ्या. पंपन्यांचे व्रेडिट रेटिंग बघा. सरकारी गोल्ड बॉण्ड सुरक्षित आहे. मात्र बॉण्डमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. ईटीएफ हे मोठमोठय़ा पंपन्यांचे असतात. त्यात काही अडचण नसते. गोल्ड ईटीएफचा
ट्रक रिपोर्ट ठेवा.
कशी झाली वाढ
2010 साली सोन्याचा भाव प्रतितोळा 18,500 रुपये होता. तो 2015 साली 26,400 प्रतितोळा इतका झाला. 2019 साली 35,200 रुपये आणि 2020 साली 48,700 रुपये झाला. सध्या सोन्याचा दर सुमारे 57 हजार रुपये प्रतितोळा आहे. याचा अर्थ 2010 ते 2023 या कालावधीत सोन्याच्या दरात 8.4 टक्के सरासरी वार्षिक वाढ ( सीएजीआर) झाली आहे.
का वाढतात दर?
सोन्याचे दर कमी जास्त होत असतात. त्याची कारणे जाणून घेऊ या. आंतरराष्ट्रीय सोने दरावर आपल्याकडील सोन्याचे दर ठरतात. त्याचप्रमाणे आपले चलन डॉलरसमोर किती मजबूत, कमकुवत आहे, त्यावरही गोष्टी अवलंबून असतात. तिसरे म्हणजे कस्टम डय़ुटीवरही सोन्याचे दर अवलंबून असतो. कस्टम डय़ुटी वाढली की, सोने वाढते. जिओपॉलिटिकल गोष्टीदेखील सोन्याच्या भाववाढीवर परिणाम करतात.