
पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा प्रांतात एका खोदकामादरम्यान सापडलेल्या बुद्ध मुर्तीचे तेथील कामगारांनी तुकडे तुकडे करून विटंबना केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पाकिस्तानातील बुद्धधर्मियांनी यावर संताप व्यक्त केला आहे. ही बुद्धमुर्ती 1700 वर्ष जुनी होती असा दावा पाकिस्तानातील पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन कामगारांना अटक केली आहे.
खैबर पख्तुन्वा प्रांतातील तख्त बाही परिसरात एका घऱाचे बांधकाम सुरू होते. त्यावेळी खोदकामाच्या वेळी कामगारांना बुद्ध मुर्ती आढळून आली. खैबर पख्तुन्व्हा या प्रांताचे पूर्वी नाव गंधारा होते त्याकाळी या भागात बुद्ध धर्मियांची मोठी संख्या होती. 2017 मध्ये खैबर पख्तुन्वा प्रांतातील भामला येथे जगातील सर्वात मोठे बुद्धमुर्ती सापडल्या होत्या






























































