मटक्याच्या अड्डय़ावर पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी येथे सुरू असलेल्या मटक्याच्या अड्डय़ावर समाज सेवा शाखेने कारवाई करून सात जणांना अंबोली पोलिसांच्या ताब्यात दिले. शंकर गणपत जाधव, राकेश बाबाजी निवळे, बाळू सखाराम सूर्यवंशी, रजा अली हाश्मी, मनोज गुप्ता, मेहबूब मुलाणी, संदीप वाडेकर अशी त्याची नावे आहेत.

अंधेरी पश्चिमच्या ऑस्टिन कंपाऊंड परिसरात काही जण मटका घेत असल्याची माहिती समाज सेवा शाखेला मिळाली. त्या माहितीनंतर समाज सेवा शाखेच्या अधिकाऱ्याने बुधवारी रात्री ऑस्टिन कंपाऊंड परिसरात छापा टाकला. तेव्हा काही जण मटक्याचे नंबर घेत असल्याचे दिसले. पोलिसांनी कारवाई करून त्या सात जणांना ताब्यात घेतले. तसेच घटनास्थळाहून पोलिसांनी मटक्याचे साहित्य जप्त केले आहे. त्या सात जणांना पुढील कारवाईसाठी अंबोली पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. आज त्या सर्वांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते.