आंगणेवाडी श्री देवी भराडीमातेची यात्रा 6 मार्चला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर परसलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेचा वार्षिकोत्सव शनिवार 6 मार्च 2021 रोजी संपन्न होणार आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर होणारा हा वार्षिकोत्सव यावर्षी मर्यादित स्वरूपात फक्त आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात येईल. अशी माहिती आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी दिली.

भाविकांच्या होणा-या गैरसोय बद्दल आम्ही दिलगीर आहोत. भाविकांना नम्र विनंती, आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून श्री देवी भराडी मातेस नमस्कार व आपलं सांगण सांगावं, आई भराडी माता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल. असे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.