आई भराडीक घरातसूनच हात जोडा! आज यात्रा, पण फक्त आंगणे कुटुंबीयांचीच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अत्यंत साधेपणाने केवळ आंगणे कुटुंबीयांच्या उपस्थितीत आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव 6 मार्च रोजी होत आहे. शासनाचे कोरोनासंबंधी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. आंगणेवाडीत येणारे सर्व मार्ग पोलिसांच्या बंदोबस्ताने सील करण्यात येणार असून कडक तपासणीनंतरच आंगणे ग्रामस्थांना आंगणेवाडीत व मंदिरात एकावेळी 50 व्यक्ती असा प्रवेश दिला जाणार आहे.

पहाटे 4 वाजल्यापासून देवीचे दर्शन सुरू होणार आहे. दरम्यान, संपूर्ण मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. तसेच देवालय परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून गेला आहे.

यात्रा कालावधीत दोन दिवस अन्य भाविकांना आंगणेवाडी यात्रेत व मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी 21 पोलीस अधिकारी, 191 पोलीस अंमलदार, 1 बॉम्बनाशक पथक, 1 आरसीपी पथक तैनात असणार आहे.