अनिल देशमुख यांच्या जामीनाला 10 दिवसांची स्थगिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. मात्र अवघ्या काही वेळातच न्यायालयाने त्यांच्या जामीनाला 10 दिवसांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे किमान दहा दिवस तरी अनिल देशमुखांना तुरुंगातच राहावं लागणार आहे.

कथित 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी सोमवारी त्यांना एक लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केलेला, मात्र सीबीआयकडून या निकालाला स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्यानंतर सीबीआयची मागणी मान्य करत न्यायालयाने दहा दिवसांची स्थगिती दिली आहे.