
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग रॅकेटचा संबंध असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात संदीप सिंह आणि ड्रग्ज या सगळ्यामध्ये भाजपचे संबंध काय? याचीही चौकशी केली जावी. याबाबतची शिफारस राज्य सरकार सीबीआयला करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज मंत्रालयात भेट घेऊन सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात संदीप सिंह आणि ड्रग्ज या सगळ्यामध्ये भाजपचे किती आणि कसे कनेक्शन आहे याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली. काँग्रेसच्या शिष्टमंडळाची ही मागणी आपण सुशांत प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयच्या टीमपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन देशमुख यांनी दिले आहे.

























































