अँटेलियाबाहेरील कार प्रकरणात परमबीर सिंह यांची भूमिका संशयास्पद! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

मुंबईचे पोलीस आयुक्त असताना अँटेलियाबाहेरील गाडीत जिलेटिन सापडणं किंवा मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही घटनांच्या बाबतीत परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची भूमिका अत्यंत संशयास्पद होती. परमबीर सिंह यांनी अतिशय गंभीर चुका केल्या. त्या माफ करण्यालायक नव्हत्या, अशा शब्दांत पुन्हा एकदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून का हटवले याचे कारण स्पष्ट केले.

अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात बोलताना अनिल देशमुख म्हणाले, मी याआधी एका कार्यक्रमातदेखील यासंदर्भात सांगितलं होतं की, परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची संशयास्पद भूमिका होती. त्यांना पदावरून हटवल्यानंतर त्या रागातून त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. त्यांना आरोप करायचे होते तर पदावर असताना त्यांनी आरोप करायला हवे होते. गेल्या 30 वर्षांच्या राजकीय जीवनात माझ्यावर एकही आरोप नाही. त्यामुळेच मी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या