अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; मनी लाँड्रिंग प्रकरणात ‘ईडी’कडून पालांडे-शिंदेंविरोधात आरोपपत्र दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे माजी पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे देशमुख यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

पालांडे आणि शिंदे या दोघा जणांना 25 जून रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना अटक करून आता 60 दिवस होत असल्याने ईडीच्या कायद्यानुसार या दोघांविरोधात ‘ईडी’च्या वतीने विशेष कोर्टात सोमवारी सकाळी आरोपपत्र दाखल करण्यात आले.

ट्रंक भरून पुरावे

या प्रकरणात आरोपपत्रात दाखल करताना ईडीच्या अधिकाऱयांनी ट्रंक भरून पुरावे विशेष कोर्टात सादर केले. आतापर्यंत ईडीने देशमुख यांच्या ठिकाणांवर छापेमारी करून महत्त्वाचे दस्ताऐवज जप्त केले आहेत.