अनिल कुमार लाहोटी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक म्हणून अनिल कुमार लाहोटी यांनी शनिवारी पदभार स्वीकारला आहे. महाव्यवस्थापक म्हणून रुजू होण्यापूर्वी ते उत्तर रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) होते. ते इंडियन रेल्वे सर्व्हीस ऑफ इंजिनिअर्सचे 1984 च्या बॅचचे अधिकारी असून आयआयटी रुड़की (पूर्वीचे रुड़की विद्यापीठ) मधील मास्टर ऑफ इंजिनीअरिंग (स्ट्रक्चर्स) आहेत.

अनिल कुमार लाहोटी यांनी रेल्वेमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. रेल्वेमध्ये रुजू झाल्यावर त्यांनी मध्य रेल्वेच्या नागपूर, जबलपूर (आता पश्चिम मध्य रेल्वे ), भुसावळ विभाग आणि मध्य रेल्वे मुख्यालय येथे 1988 ते 2001 पर्यंत विविध पदांवर काम केले. त्यांनी रेल्वे बोर्डाचे सदस्य ( इंजिनीयरिंग) यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच मुख्य अभियंता (निर्माण), उत्तर रेल्वे; कार्यकारी संचालक (ट्रक मशीन्स), रेल्वे बोर्ड आणि उत्तर मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य अभियंता म्हणूनही काम केले आहे.