
संतोष देशमुख हत्येप्रकरणी आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यावरून अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या कुटुंबाचं राजकारण आता संपलं, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार गेले असताना तिथे धनंजय मुंडे कुठेही दिसले नाहीत. भाषणात अजित पवार म्हणाताहेत की, इथे कोणाचाही बड्या बापाचा बेटा असला तरीसुद्धा त्याच्यावर कारवाई होईल. आका असो, बाका असो, काका असो… सगळ्यांवर कारवाई होईल. एकदा माफ केलं जाईल, दोनदा केलं जाईल. तिसऱ्या चौथ्यांदा जर झालं तर चौथ्यांदा थेट त्यांच्यावर मोक्का लावा, असे अजित पवार म्हणाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजाभाऊ मुंडे नावाच्या व्यक्तिला अजित पवार गटात घेतलं गेलं. याचा अर्थ धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या कुटुंबाचं राजकारण आता संपलं. आता वंजारी समाजाला जवळ ठेवण्यासाठी राजाभाऊ मुंडेंना घेतलं गेलं आहे. या सगळ्यावरून दिसतंय की, आता धनंजय मुंडे यांना कुठेही थारा मिळणार नाही, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
कौशल्य विकास विभागातील पदोन्नत्यांची चौकशी करा, अंबादास दानवे यांची मागणी
सकाळी सात वाजल्यापासून बातमी चालतेय की, संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग मिळाला नाही, ही बातमी आली कुठून? कुठून टपकली? स्पष्टपणे अजित पवार धनंजय मुंडेंना बाजूला करताहेत. म्हणूनच धनंजय मुंडेंनी थेट कार्यकर्त्यांद्वारे ही बातमी पेरलेली आहे. घनंजय मुंडे संपला ही गोष्ट सगळ्यांच्या डोक्यात गेली नाही पाहिजे. म्हणून ही बातमी पेरण्यात आली आहे, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली.
कानाखाली मारेन, बडतर्फ करेन; भाजपच्या मंत्रीणबाईंची भरसभेत ग्रामविकास अधिकाऱ्याला धमकी
संतोष देशमुख प्रकरणात कुठेही धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळालेली नाही. काल रात्रीपासून आतापर्यंत अशी कुठलीही घटना घडलेली नाही. अजित पवारांनी एक नाही तीनदा त्यांना जो चाप मारला, त्यासाठी परत कार्यकर्त्यांद्वारे त्यांनी ही बातमी पेरली आहे. त्यांच्या विरुद्ध मी लढत राहणार आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या. जनभावनेतून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला यात काहीच दुमत नाही. कारण संतोष देशमुखांचे फोटो बाहेर आले आणि त्यातली क्रूरता बाहेर आली. आणि तो करणारा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या जवळचा होता. म्हणूनच त्यांचा राजीनामा घेतला गेला. कुठलंही कारण असलं तरी या माणसाला परत येऊ देणार नाही, असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला.