महायुतीची अधिकृत घोषणा झाली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीसाठी महायुतीची अधिकृत घोषणा पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. राज्यात पाच वर्षात महायुती सरकारने यशस्वी कारभार करत राज्याला नव्या उंचीवर नेण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार युती सरकारने चांगला कारभार केला आहे. त्यामुळे आगामी निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

इतिहास घडणार, आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा निवडणूक लढणार!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मित्रपक्षांचे नेते रामदास आठवले, महादेव जानकर,विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेनंतर आगामी निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ही घोषणा करण्यात येत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. या पत्रकावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महायुतीत कोणता पक्ष कोणती व किती जागा लढवणार, याबाबतचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही पत्रकात म्हटले आहे. या निवडणुकीत महायुतीला जनतेचा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.