
वरळी येथे शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा सुरू आहे. या मेळामध्ये शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. वरळी मतदारसंघातून ते विधानसभा निवडणूक लढणार आहेत.
- शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा – संजय राऊत
- महाराष्ट्राचा छावा राजकारणामध्ये आला आहे – संजय राऊत
- ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार होण्यासाठी हजारो शिवसैनिक उपस्थित
- हा जो लढण्याचा निर्णय मी घेतला आहे तो स्वत:साठी नाही आहे, मी जनतेच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे – आदित्य ठाकर
-
इतिहास घडणार, आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा निवडणूक लढणार!
- जर आपली परवानगी असेल, विद्यमान आमदारांची परवानगी असेल आणि शिवसैनिकांची परवानगी असेल तर मी शिवरायांच्या साक्षीने, सर्व महापुरुषांच्या साक्षीने, माझ्या आजी आजोबांच्या साक्षीने मी निवडणुक लढविणार ही घोषणा करतो – आदित्य ठाकरे
- गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्र पिंजून काढला – आदित्य ठाकरे
- लहानपणापासून राजकारणाची आवड – आदित्य ठाकरे
- शिवसेनेने राजकारण नाही तर समाजकारण केले – आदित्य ठाकरे
- 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण हेच शिवसेनेचे सूत्र – आदित्य ठाकरे
- वरळीमध्ये शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा सुरू
































































