नेस्को ड्रग प्रकरणात आणखी एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेस्को प्रदर्शन ड्रग पार्टीप्रकरणी आणखी एकाला वनराई पोलिसांनी अटक केली. शुभ अग्रवाल असे त्याचे नाव आहे. या गुह्यात एक जण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शुभच्या अटकेने अटक आरोपीची संख्या आठ झाली आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

गेल्या आठवडय़ात नेस्को प्रदर्शन पेंद्रात झालेल्या पार्टीत ड्रगच्या ओव्हर डोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्याची दखल वनराई पोलिसांनी घेतली. वनराई पोलिसांनी गुन्हा नोंद करून सात जणांना अटक केली होती. तपासादरम्यान दक्षिण मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेणाऱया युवतीचा पोलिसांनी जबाब नोंदवला. तिच्या जबाबात काही महत्त्वाची माहिती मिळाली. तिला ती पिवळी गोळी रौनक खंडेलवाल याने दिली होती. पोलिसांनी प्रतीक पांडेची चौकशी केली. त्याने त्या गोळ्या आनंद पटेलकडून घेतल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी आनंदची देखील चौकशी केली. नशेच्या गोळ्या शुभने दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्या माहितीनंतर पोलिसांनी कल्याण येथून शुभला ताब्यात घेऊन अटक केली. शुभने त्या गोळ्या आनंद पटेलकडून घेऊन प्रतीकला नेऊन दिल्या होत्या अशी माहिती तपासात समोर आली आहे.