अंशुल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदिवली पश्चिममधील महावीर नगर येथील अंशुल प्लाझा सोसायटीच्यावतीने अंशुल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष असून शनिवार आणि रविवार 17, 18 डिसेंबर आणि शनिवार आणि रविवार 24, 25 डिसेंबर 2022 रोजी अंशुल प्लाझा सोसायटीत चार दिवस सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत ही स्पर्धा आयोजित केली आहे. या चार दिवसांत एकूण 40 मॅचेस होणार आहेत.

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग हे स्पर्धेचे मोठे आकर्षण आहे. 6 वर्षांच्या मुलापासून ते 70 वर्षांच्या ज्येष्ठांचा यात सहभाग असणार आहे. स्पर्धेत एकूण 170 खेळाडू खेळणार असून 17 संघ खेळणार आहेत. त्यात लहान मुलांचे 3 संघ, महिलांचे 4 संघ आणि पुरुषांचे 10 संघ खेळणार आहेत.