अंशुमन गौतम ठरला रेडिओ सिटी सुपर सिंगर

419

अंशुमन गौतम हा रेडिओ सिटी सुपर सिंगरच्या 11 च्या पर्वाचा विजेता ठरला आहे. रेडिओ सिटीचा हा सर्वात मोठा टॅलेंट हंट शो मालाड येथील इन्फिनिटी मॉल येथे पार पडला. विविध शहरांतील गायकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रशांत सल्कादी, अंशुमन गौतम, जननी कामाक्षी, आलिया शेख आणि मयंक जयस्काल हे पाच स्पर्धक पोचले होते. यामधून संगीतकार सचेत आणि परंपरा या जोडीने अंशुमन गौतम याची रेडिओ सिटी सुपर सिंगर म्हणून निवड केली.  विजेत्याला एक लाख रुपयांचा पुरस्कर देऊन गौरकण्यात आले. अंशुमनने आपल्या गाण्यान प्रेक्षकांना, परीक्षकांना मंत्रमुग्ध केले. सिंगिंग टॅलेंट शोधण्याच्या या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे रेडिओ सिटीचे चीफ क्रिएटिक्ह ऑफिसर कार्तिक कल्ला यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या