लाच घेताना वरिष्ठ निरीक्षक ट्रप

एका गुह्यात मुलीस आरोपी न करण्याबरोबर गुह्यात मदत करण्यासाठी व  विरुद्ध गटातील व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी एकूण साडेपाच लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी दोन लाख 30 हजार घेताना वडाळा टी टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व उपनिरीक्षकाला अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दोघांनाही अटक करण्यात आली. उपनिरीक्षक राहुल वाघमोडे यांनी स्वतः साठी 50 हजार आणि वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्यासाठी पाच लाखांची मागणी केली. दोन लाखांचा हप्ता स्वीकारताना वरिष्ठ निरीक्षक सरोदे यांना अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले. दोघांविरोधात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.