
>> अनुप जलोटा, ज्येष्ठ भजन गायक
अखंड रियाज सुरू आहे. ज्यावेळी मी आंघोळ करतो, जेवतो आणि ज्यावेळी झोपतो, फक्त तेव्हाच मी संगीताचा रियाज करत नाही. उरलेल्या सर्व वेळी माझी संगीत साधना सुरू असतो. मी सकाळी 8 वाजता उठतो. माझ्या बेडजवळ तानपुरा असतो. मी उठताच तानपुरा सुरू होतो आणि रात्री माझ्या झोपेच्या केळेला बंद होतो. मी गेली 55 वर्षे योगसाधना करतोय. ज्यावेळी ‘योग’ करतो, त्यावेळीही संगीत सुरू असतं.
लॉकडाऊनच्या काळात मी काही नवीन भजनं तयार केली आहेत. आघाडीच्या दोन म्युझिक कंपन्यासाठी हे काम करतोय. लॉकडाऊन पूर्ण उठल्यावर तुम्ही माझी नवनवीन भजनं ऐकू शकाल तसेच त्याचे व्हिडियो बघू शकाल. सध्या त्यावर काम सुरू असून त्याची झलक मी युटय़ुबवरून देतच असतो. याशिवाय नियमित भजनं, गाणी मी सोशल मीडियावर अपलोड करतो. याआधीही मी पोस्ट करायचो. पण आता कोरोनामुळे लोक जास्त वेळ घरात असतात. त्यामुळे त्यांना संगीताचा आनंद घेता यावा, म्हणून त्यांच्यापर्यंत घरबसल्या भजनं पोचवायचा प्रयत्न करतो. यानिमित्ताने लोकांशी संवादही साधायला मिळतो. या सगळ्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय.
संगीत आणि वाचनाचा खूप घनिष्ठ मेळ आहे. वाचन केल्याशिवाय आणि संशोधन केल्याशिवाय संगीत निर्माण होऊ शकत नाही. उदाहरणार्थ कबीरदास यांचं भजन गायचं असेल तर आधी ते शोधावं लागतं. ते हृदयात उतरावं लागतं. त्याचा सखोल अभ्यास करावा लागतो. त्यानंतरच मी गातो. त्यामुळे सप्तसूरांसोबत वाचन आणि अभ्यासही या दिवसांत सुरू आहे. लॉकडाऊनमुळे शिष्यांना भेटता आलं नाही. पण सगळे शिष्य फोनवरून संपर्कात आहेत. त्यांना फोनकरून गाणं शिकवतो, मार्गदर्शन करतो. कोरोना संकटात डॉक्टर्स, नर्स, पोलीस असे अनेक कोरोना कॉरियर्स जीवावर उदार होऊन काम करत आहेत. या कठीण परिस्थितीत लोकांनी घाबरून जाऊ नये, योग्य खबरदारी घेऊन स्वत:चा बचाव करावा, यावर आधारित खास गीत आम्ही अनेक गायक मंडळींनी गायलं. त्यामध्ये आशाजींचाही त्यामध्ये सहभाग होता. अशा काही उपक्रमात सहभागी झालो.
संगीत हे एकप्रकारचे ‘हिलिंग’ आहे. संगीतात मोठी ताकद आहे. तुमच्या आकडीचं गाणं ऐका. जर तुम्हाला शास्त्राrय संगीत आवडतंय तर तुम्ही मायकल जॅक्सन ऐकून उपयोग नाही. जर मायकल आवडतंय तर तेच ऐका. प्रत्येकाची अभिरुची वेगवेगळी असते. त्यानुसार संगीतातून आनंद घ्या. नकारात्मक विचार टाळा.
संगीत आपल्या श्वासोच्छवास आणि रक्तदाबाला ‘नॉर्मल’ करतं. समजा कुणाला टेंशन आलं की लतादीदींचं भजन किंवा जगजित सिंगजींचे गाणे ऐकले तर टेंशन कमी होतं. आणि टेंशन कमी झालं तर रक्तदाब नॉर्मल होतो.
सर्कांना एवढंच सांगेन की आपली प्रतिकारशक्ती वाढवावा. योग, प्राणायाम, मेडिटेशन करा. च्यवनप्राश, सितोफलादी चूर्ण खा. लॉकडाऊनचे दिवस आपल्याला खूप काही शिकवून गेले आहेत आपण विनाकारण खर्च करतो. तसेच नको त्या गोष्टींमागे वेळ काया घालवतो. या महामारीच्या काळात अनेक गोष्टी नव्याने उमगल्या आहेत. मन शांत ठेवा, संयम पाळा.

























































