
अभिनेत्री आणि निर्माती अनुष्का शर्मा ही सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. ती तिचा पती आणि क्रिकेटपटू विराट कोहली याच्यासोबत एका हॉस्पिटलमध्ये जाताना दिसल्याने ती गर्भवती असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वी ही जोडी मालदीव येथे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती. तिथून परत आल्यानंतर अनुष्का शर्मा ही पती विराटसह मुंबईच्या एका नामांकित रुग्णालयात जाताना दिसली. त्यामुळे ती तिथे गरोदरपणाच्या तपासणीसाठी गेली होती.
त्यामुळे तिच्या गरोदरपणाची चर्चा सुरू झाली आहे. पण, अनुष्का गरोदर नसून ती फिजिओथेरपिस्टकडे तपासणीसाठी गेल्याची माहिती मिळत आहे. ती तिच्या आगामी चकदा एक्सप्रेस या चित्रपटात क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे.
हा चित्रपट झुलन गोस्वामी या महिला गोलंदाजाचा बायोपिक असेल. त्यामुळे त्या तयारीसाठी ती वेगवान गोलंदाजीचा सराव करत आहे. या दरम्यान दुखापत टाळण्यासाठी तसंच योग्य त्या प्रकारे व्यायाम समजून घेण्यासाठी ती फिजिओथेरपिस्टकडे गेल्याचं वृत्त आहे.
























































