
अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल याचा ‘कला’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बाबिलच्या अभिनयाचे कौतुक होत असताना, अभिनेत्री अनुष्का शर्माही चांगलीच चर्चेत आली आहे. ‘कला’मधील अनुष्काच्या रेट्रो लुकने चाहते घायाळ झाले आहेत.
अनुष्काने ‘कला’ चित्रपटात ‘घोडे पे सवार’ गाण्यात पॅमिओ केला आहे. त्यातील तिचा ब्लॅक अँड व्हाईट लुक, स्टाईल आणि वैशिष्टय़पूर्ण अदा सिनेप्रेमींना फारच आवडली आहे. सोशल मीडियावर अनुष्काने भरपूर कौतुक होत आहे. त्याबद्दल अनुष्कानेही प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
‘कला’ हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये बाबिल याच्यासह तृप्ती डिमरी, स्वस्तिका मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत






























































