अनुष्का शेट्टीच्या हॉरर फिल्मचं पहिलं पोस्टर लाँच, सोशल मीडियावर फुल चर्चा

‘बाहुबली’ चित्रपटामुळे देवसेना म्हणून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्या नव्या चित्रपटाची साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे. पौराणिक प्रकारच्या चित्रपटाला मिळालेल्या भव्य यशानंतर आता ती एका ‘हॉरर’ म्हणजेच भयपटातून प्रेक्षांच्या भेटीला येणार आहे. ‘ Silence ‘ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचं पहिलं पोस्टर आज लाँच करण्यात आलं आहे. बाहुबली- 2 मध्ये देवसेनाची भूमिका करणाऱ्या अनुष्काच्या सौंदर्याची चर्चा रंगली होती. आता ‘सायलेन्स’चं पोस्टर झाल्यावर तिच्या लुकवर पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे.


View this post on Instagram

#Nishabdham #Silence ‬ First Look in 5 Languages

A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on

अनेकांनी या पोस्टरचं कौतुक केलं आहे. अनुष्का बऱ्याच काळानंतर या लुकमध्ये दिसली आहे. एका नदीच्या किनाऱ्यावर अनुष्का कॅनव्हासवर चित्र रंगवताना दिसत आहे. तिच्या मागे नदीच्या दुसऱ्या तिरावर मेट्रोसिटी पाहायला मिळते आहे. अनुष्काच्या चेहऱ्यावरचे भाव शांत असले तरी बरचे काही बोलून जात असल्याचे जाणवते असे अनेकांनी म्हटले आहे. या चित्रपटात तिचं नाव साक्षी असून ती मूक कलाकार असल्याचं पोस्टरमध्ये म्हटलं आहे. पोस्टर लाँचमुळे तिच्या या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकाता लागली आहे. सायलेन्समध्ये तिच्या सोबत आर. माधवन देखील झळकणार आहे.

silence-anushka-shetty

अनुष्का शेट्टीच्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे सोलश मीडियावर अभिनेता सलमान खान याच्या दबंग-3 च्या मोशन पोस्टर लाँचबरोबरच अनुष्काचा सायलेन्स ही चर्चीला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या