हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यास सडेतोड उत्तर देऊ नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांचा इशारा

हिंदुस्थानवर वाईट नजर ठेवणाऱयास नौदलाकडून सडेतोड उत्तर दिले जाईल. ऑपरेशन सिंदूर सध्या थांबवले असले तरी ते अजूनही संपलेले नाही. ज्या दिवशी देशावर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आमचे जवान सोडणार नाही. सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असा सज्जड इशारा नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी दिला आहे. दिल्लीत आर्म्ड पर्ह्सेस फ्लॅग डे फंक्शन 2025 आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मला वाटते की, या देशातील नागरिकांना आपल्या सैन्याचा अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. मे 2025 मध्ये सुरू झालेल्या या ऑपरेशनदरम्यान हिंदुस्थानी नौदलाने पाकिस्तानी नौदलाविरुद्ध मजबूत तैनाती केली होती. यामुळे पाकिस्तानी नौदल आपली जहाजे बंदरातून बाहेर काढू शकले नव्हते आणि ते अरबी समुद्राजवळच्या मकरान किनारपट्टीपर्यंत मर्यादित राहिले होते. गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून पश्चिम अरबी समुद्रात आमचे ऑपरेशन सातत्याने सुरू आहे. यामुळे पाकिस्तानकडे जाणाऱया व्यापारी जहाजांचे मार्ग कमी झाले आहेत. त्यांची विमा रक्कम महाग झाली आहे. यामुळे शेजारील देशावर आर्थिक दबाव वाढला आहे. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याच्या मोहिमेत, नौदल युनिट्सने गेल्या वर्षी इतर राष्ट्रीय एजन्सींसोबत मिळून 43,300 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. आम्ही आमच्या जबाबदाऱया अत्यंत प्रभावीपणे पार पाडत आहोत आणि आम्हाला याचा अभिमान आहे, असेही ते म्हणाले.

महिला अधिकाऱयांचे काwतुक

नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा या दोन महिला अधिकाऱयांचे काwतुक केले. या दोन्ही महिला अधिकाऱयांनी 2 ऑक्टोबर 2024 ते 29 मे 2025 या कालावधीत 240 दिवसांत 23,400 सागरी मैलांची जागतिक परिक्रमा पूर्ण केली. या प्रवासात दोघींनी 4 खंड, 3 महासागर आणि केप ऑफ गुड होप, केप लीविन आणि केप हॉर्न हे तीन प्रमुख केप पार केले.